आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भासह मराठवाड्यात सूर्य ओकतोय आग...चंद्रपुरात 45.1 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विदर्भासह मराठवाड्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. बहुतांश जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर गेला आहे. चंद्रपूर, अमरावतीचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे तर मराठवाड्यातील परभणीत सर्वाधिक 44.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांचाही पारा पुढील दोन ते तीन दिवसांत 45 अंश सेल्सिअसच्या पलिकडे जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भात रविवारपर्यंत (26 ते 29 एप्रिल) उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमानात मागील आठवड्यापासून लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात मध्य महाराष्ट्रासह राज्यातील तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी मराठवाडा, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर राहिला. परभणीत देशातील सर्वाधिक 44.1 अंश तापमानाची नोंद झाली.

 

राज्यातील तापमान
- परभणी 44.1
- नांदेड 43
- औरंगाबाद- 40
- उस्मानाबाद- 41
- बीड- 42
- अकोला- 43.3
- चंद्रपूर- 43.9
- यवतमाळ- 42.5
- अमरावती- 44
- बुलडाणा- 40.6
- नगर- 41.8
- सोलापूर- 42.1
- जळगाव- 42.9
- नाशिक- 39.1

 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा.. उन्हाळी दूर करण्याचे इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...