आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा खून, शृंगार करून मृतदेह लटकवला; पती रेकाॅर्डवरील गुन्हेगार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एका माथेफिरू पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाला नवीन साडी नेसवून, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून, लिपस्टिक लावून साजशृंगार करत तिला पुन्हा फासावर लटकावून दिले. काेमल राहुल हंडाळ (२१) असे मृत महिलेचे नाव अाहे. तिचा पती अाराेपी राहुल राजेश हंडाळ (२३) याला पाेलिसांनी अटक केली अाहे.  ही घटना गुरुवारी पहाटे सिंहगड राेड पाेलिस ठाण्याचे हद्दीत कुटे मळा भागात घडली.  


तीन वर्षांपूर्वी राहुलचे लग्न झाले हाेते. मात्र, ताे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हाेता. याच कारणावरून बुधवारी रात्रीही दाेघांत वाद झाल्यानंतर त्याने पहाटे काेमल हिचा गळा दाबून खून केला. मात्र, एवढ्यावरच न थांबता या माथेफिरूने मृत पत्नीला नवीन साडी, मंगळसूत्र घातले. पावडर, लिपस्टिक लावून तिचा मृतदेह फॅनला  गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. तसेच  काेमलच्या कुटुंबीयांना व नातेवाइकांना फाेन करून ‘मी पत्नीचा खून केला,’ अशी कबुलीही दिली. नातलग येईपर्यंत अाराेपी फरार झाला हाेता.  नंतर त्याला डेक्कन नदीपात्रातून अटक करण्यात अाली.

 

पती रेकाॅर्डवरील गुन्हेगार
अाराेपी राहुल हंडाळ हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चाेरी, घरफाेडीचे १० गुन्हे दाखल अाहेत. त्याला दारूचेही व्यसन अाहे. पाेलिसांनी घराची पाहणी केली असता त्यांना काेमलच्या डाेक्यातान रक्तस्राव हाेताना दिसले. तसेच तिचा गळा दाबल्याच्या खुणाही दिसत हाेत्या. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात अाला.

 

 पुढील स्लाईडवर पहा आरोपीचा फोटो .... 

बातम्या आणखी आहेत...