आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MBBS Student Suicide Case: विधानसभेच्या माजी सचिवाच्या कन्येला पुण्यात अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/बैतूल- भोपाळच्या (मध्यप्रदेश) एलएन मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी यश पाठे यास मानसिक त्रास देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी आरोपी श्रुती शर्मा आणि तिचा मित्र शालीन उपाध्याय याला पुण्यात अटक करण्‍यात आली. दोन्ही आरोपी घटनेनंतर फरार होते. दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा बैतूलला आणले. आरोपी श्रुती शर्मा विधानसभेचे माजी सचिवाची कन्या आहे.

 

यश पाठे याने बैतूल येथे राहात्या घरी 13 जूनला रात्री गळफस लावून आत्महत्या केली होती.

 

5 विद्यार्थ्यांना बनवले आरोपी...
भोपाळ येथे बैतूलहून शिक्षणासाठी आलेल्या यश पाठेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी शालीन उपाध्‍याय, गौरव दुबे, आकाश सोनी, श्रुती शर्मा (सर्व रा. भोपाळ) आणि कार्तिक खरे (रा. सतना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गौरव आणि आकाशला आधीच अटक केली होती. कार्तिक खरे अद्याप फरार आहे

 

आरोपी श्रुती शर्माच्या इशार्‍यावर काम करत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. श्रुतीचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ 11 किंवा 12 जूनला शूट केल्याचे सांगितले जात आहे. श्रुती ही यशला धमकी देताना तर तिचा मित्र त्याला बेल्टने मारहाण करताना व्हिडिओत दिसत आहे.