आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त इंद्रायणीच्या तिरावर लोटला जनसागर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुखात हरिनामाचा जप आणि अंत:करणात भगवंताला भेटण्याची ओढ असणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या साक्षीने देहू नगरीत आज (3 मार्च) 370 वा तुकाराम बीज सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.

 

तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला निघाले होते. तोच हा दिवस. वीणा, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषान देहू नगरीचा आसमंत दुमदुमला होता.

 

सदेही तुकया वैकुंठाशी गेले ।। असे अभंग आळवीत...

 

इंद्रायणीच्या तिरावर भल्या पहाटे लाखो भाविकांनी स्नान करून पांडुरंगांच्या मुख्य मंदिरातील आणि तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. पहाटे तीन वाजता काकड आरतीने बीज सोहळ्याची सुरूवात झाली. चार वाजता मुख्य मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि श्री संत तुकाराममहाराजांच्या शिळामंदिरात महापूजा करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुंठगमन मंदिराकडे टाळ मृदंगाच्या आणि हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले.

 

दुपारी बारा वाजता 'बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल' आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू गरुड घेऊन देहूला आले आणि त्यांना सदेह वैकुंठाला नेले. गरुड परत जात असताना त्याचा पाय या नांदुरकीच्या झाडाला लागला होता, अशी आख्यायिका आहे. सोहळयाच्या दिवशी दुपारी बारा वाजता या झाडाची फांदी हलताना भाविकांना दिसते, असही मानले जाते. या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी नांदुरकीच्या झाडाजवळ गर्दी केली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संत तुकाराम बीज सोहळ्याचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...