आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • प्रेमप्रकरणातून मित्राने चिरला तरुणाचा गळा; लिंग कापलेल्या अवस्‍थेत सापडला मृतदेह Love: Murder Youth In Pune

प्रेमप्रकरणातून मित्राने चिरला तरुणाचा गळा; लिंग कापलेल्या अवस्‍थेत सापडला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेंढवा परिसरात मुंडके नसलेल्या व लिंग कापलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहामागील रहस्य उघडकीस आले. नात्यातील मुलीशी सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून मित्रानेच ही हत्या केल्याचे समोर आले. उमेश भीमराव इंगळे (२०, रा. बिबवेवाडी, पुणे) असे मृताचे नाव अाहे. याप्रकरणी निजाम अासगर हाशमी (१८, रा.बिबवेवाडी, पुणे) याला अटक केली आहे. 


पोलिसांच्या मते, उमेश इंगळे व निजाम हाशमी हे २०१६ पासून खिडक्या बनवण्याचे काम करत होते. उमेशच्या नात्यातील मुलीशी निजामचे प्रेमसंबंध हाेते. त्यावरुन निजाम व उमेश यांच्यात वाद झाला होता. १६ जून राेजी ईदच्या दिवशी सायंकाळी निजामने उमेशला ईदचा शिरखुर्मा खाण्यासाठी जवळच्या मैदानावर जाण्यासाठी दुचाकीवर नेले. त्याठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, उमेश हा माेबाइलमध्ये पाहत असतानाच निजामने त्याच्या मान, पोट आणि हातावर धारदार शस्त्राने वार केला. यात उमेशचे मुंडके अर्धे तुटले होते. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने निजामने तो पूर्ण कापून अज्ञात स्थळी फेकून दिला. पाेलिसांना मुंडके अद्यापही सापडले नाही. 


घटनास्थळाजवळ शरीरसाैष्ठव स्पर्धेचा टी-शर्ट सापडला होता. त्यावर 'एस.के.फलटण' असा उल्लेख होता. फलटणमध्ये पोलिसांनी संबंधित शरीरसाैष्ठव स्पर्धा, त्यात सहभागी खेळाडू आदींची माहिती जाणून घेतली. दरम्यान, बिबवेवाडी पाेलिस ठाण्यात युवक बेपत्ता असल्याची तक्रार आली होती. मृतदेह आणि त्यात साधर्म्य मिळून अाले. त्यावरून तो उमेशच असल्याची ओळख पटली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...