आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 185 मराठा आंदोलकांना अटक..पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे रोखणाऱ्या 150 जणांवर गुन्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठा क्रांती मोर्चाने क्रांती दिनी (9 ऑगस्ट) पुकारलेल्या महाराष्‍ट्र बंदला पुण्यात हिंक वळण लागले होते. बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच  डेक्कन आणि चांदणी चौक भागात धुडगुस घालणार्‍या185 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.सगळ्यांना 200 पोलिसांच्या बंदोबस्तात पुणे कोर्टात हजर करण्यात आले. 

 

दुसरीकडे, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले. उर्से टोल नाक्यावर दोन्ही दिशेची वाहतूक तब्बल सहा तास ठप्प होती. याप्रकरणी 150 ते 175 आंदोलकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

रस्ता अडवणे, जमाव जमवणे तसेच नव्यानेच लागू झालेला हायवे अॅक्ट 8 (ब) नुसार तळेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले. सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे काल (गुरुवारी) सकाळी साडे दहा वाजता एक्स्प्रेस वेवर ठिय्या आंदोलन करण्‍यात आले होते. टाळ मृदुगाचा गजर करत, भजन-कीर्तनातून सरकारचा निषेध करण्यात आला होता. नंतर तब्बल 700 ते 800 चा जमाव रस्त्यावर उतरला होता. पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात होते. या आंदोलनामुळे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेकडो प्रवासी अडकून पडले होते. तब्बल सहा तासाने या सर्वांची सुटका झाली. त्यामुळे पोलोसांनी शेवटच्या 150 ते 175 च्या जमावावर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्‍यात येणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...महाराष्ट्र बंददरम्यान पुण्यात झालेल्या मराठा आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...