आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे 20 ऑगस्टपासून पुण्यात बेमुदत चक्री उपोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाकडून आतापर्यंत वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. पुणे येथे घडलेल्या हिंसक आंदोलनानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिली.

 

कुंजीर म्हणाले, पुणे येथे क्रांतिदिनाला झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी विविध ठिकाणच्या 186 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यापैकी 183 जणांची जामिनावर मुक्तता झाली असून उर्वरित तिघांचा जामीन लवकर होर्इल. गेल्या काही दिवसांत मुंबर्इसह औरंगाबाद, चाकण, कळंबोली, नवी मुंबर्इ या ठिकाणी जाणीवपूर्वक दंगली घडवण्यात आलेल्या होत्या. यामध्ये कोण सहभागी आहे याचाही शोध घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...