आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मातंग समाजाचा ‘मूक मोर्चा’, महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी मातंग समाजावर झालेल्या अन्याय व अत्याचाराचा विरोध आणि विविध मागण्यांसाठी मातंग संघर्ष महामोर्चाचे वतीने शनिवारी ‘मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. सारसबागेसमोरील शाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान वाचन आणि लहुजी वंदना म्हणून  हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.

 

हजारोंच्या संख्येने प्रथमच समाज बांधव आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. मोर्चाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील भरीव योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. 

 

महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त सहभाग  
मातंग संघर्ष महामोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मूक मोर्चा’मध्ये महिला आणि युवतींचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या पुढच्या भागात महिला, युवती आणि त्यानंतर पुरुष होते. तसेच चार रांगांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत मोर्चा होता. ही रांग कोणत्याही प्रतिनिधीने मोडली नसल्याचे दिसून आले. बहुतांशी महिला आणि  युवतींनी पिवळ्या रंगाच्या साड्या आणि टी-शर्ट परिधान केले होते. तसेच  हातात पिवळ्या रंगाचे झेंडे घेतलेले होते.

 

मातंग संघर्ष महामोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात  आलेल्या या मूक मोर्चामध्ये मातंग समाजासह  विविध सामाजिक संघटना, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मोर्चा  बाजीराव रस्तामार्गे पुढे लक्ष्मी रस्त्याने  गणपती चौक, बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, आर्यभूषण थिएटर, संत कबीर चौक, नेहरू रोड, नरपतगिरी मार्गे  पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा गेला. 

 

अनुसूचित जातीच्या एकत्रित आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारी करावी. सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये शिथिलता आणलेली आहे. त्यामुळे राज्यात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार वाढलेले आहेत. ही बाब लक्षात घेऊन  अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. मागासवर्गीय महामंडळाकडील सर्व थकीत कर्जे माफ करावीत. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...