आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन नातीवर बलात्कार, पीडितेने स्वत: पोलिसांत दिली तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देहू रोड येथे नराधम आजोबाने अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने स्वतःहून देहूरोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तरी देखील 55 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक करण्यात आली नाही.

 

सूत्रांनुसार, आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील देहू रोड येथे घडली आहे. 55 वर्षीय आजोबाने आपल्या 13 वर्षीय नातीवर बलात्कार केला. पीडित मुलगी ही मामाकडे राहण्यास असते. काल (रविवारी) सायंकाळी घरात कोणी नसताना नराधम आजोबाने बळजबरी केली. सोमवारी सकाळी ही घटना उघड झाली. पीडित मुलीने देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेवून नराधम आजोबाविरुद्ध तक्रार केली. पोलिसांत नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक केली नसल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...