आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार; वर्गशिक्षकाला मुलींनी सांगितली आपबिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विद्येचे मा‍हेरघर असलेल्या पुणे शहरापासून जवळच असलेल्या पिंपरी-चिंचवड येथे दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी देखील अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पीडितेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. अत्याचार करणारे आरोपही अल्पवयीन आहे. ते 14 आणि 16 च्या वयोगटातील असून त्यांनी जानेवारीपासून 18 एप्रिलपर्यंत मुलींवर अत्याचार केले. पीडित मुलींने हा प्रकार वर्ग शिक्षकाला सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

 

'मुलगी शाळेत जाते तिला बॅड टच आणि गुड टच' हे वर्गात शिकवले जात असताना पीडितेने शिक्षकाला आपबिती सांगितली. शिक्षकाला मुलीच्या आईला या गंभीर प्रकाराबाबत माहिती दिली. आरोपी हे मुलींना घराच्या बाहेर खेळायला नेत तसेच कोणी नसताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. पीडित मुलींची आई धुनी-भांडे करते तर वडील बिगारी काम करतात.

 

याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने पिंपरी पोलिसांत 14 आणि 16 वयाच्या अल्पवयीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...