आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक..पुण्यात जन्मदात्यानेच केले अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार, विष देवून मारण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात महिन्यांपासून नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. तिला विष देऊन जिवे मारण्याचीही त्याने धमकी दिली होती. अखेर पीडितेचा संयमाचा बांध फुटला आणि तिने भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

सूत्रांनुसार, भोसरीत ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी बहीण, भाऊ आणि आई वडिलांसह राहात होती. नराधम बाप दिवाळीपासून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होता. तिला त्याने विष देऊन जिवे मारण्याचीही धमकी दिली होती. बापाकडून तब्बल सात महिने होणारा लैंगिक छळ सहन केल्यानंतर अखेर पीडितेनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत पोलिसांसमोर आपबिती कथन केली. नराधम बाप फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

बातम्या आणखी आहेत...