आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी; अमूलचे दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष- राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात सुरु असलेल्या दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी आहे. गुजरातमधील अमूलचे दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. सोबतच राज्यातील खड्डयांपासून तर नीट परीक्षेपर्यंत राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत परखड मत मांडले. राज यांनी 'नीट' परीक्षेवरुन सत्ताधारी भाजप सरकारवर खोचक टीका केली.

 

हेही वाचा..तीन वर्षांनंतर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर; 3 दिवस औरंगाबादेत मुक्काम

 

नीट (NEET) परीक्षेनंतर अॅडमिशनसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळायलाच हवे, असेही राज ठाकरेंनी सांगितले. एवढेच नाही तर नीट परीक्षेला बाहेरुन मुले भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल, असा धमकीवजा इशारा देखील त्यांनी दिला आहे. नीट परीक्षेच्या संदर्भात इतर राज्यांनी कायदा केला आहे, मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

बातम्या आणखी आहेत...