आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एसटी बसमध्ये विवाहितेचा विनयभंग; नातेवाईकांनी आरोपीला दिला चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- तळेगाव येथे 28 वर्षीय विवाहित महिलेचा एसटीमध्ये प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी किरण नामदेव थोरात याला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला खेड ते तळेगाव असा ऐकटी एसटीने प्रवास करत होती. पीडित महिलेच्या पाठीमागील सीटवर आरोपी किरण नामदेव थोरात हा बसला होता. तो देखील तळेगावला जात होता. आरोपीने सीटच्या आणि खिडकीच्या सांधीमधून महिलेच्या कंबरेला पकडले. महिलेसोबत अश्लील वर्तन केले. पीडितेने ही बाब फोनवरून आपल्या नातेवाईकांना कळवली. नातेवाईक थेट तळेगाव बस स्थानकात पोहोचले. आरोपी किरण थोरातला चांगलाच चोप दिला. नंतर बस थेट तळेगाव पोलिस ठाण्यात नेण्यात आली. पीडित महिलेने किरण थोरात विरोधात फिर्याद नोंदवली असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुट पाटील हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...