आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंनी या वक्तव्याने जिंकली होती उपस्थितांची मने; आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला नाही..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांचा आज (24 फेब्रुवारी) वाढदिवस. त्यांनी एका कार्यक्रमांत भावनिक वक्तव्य करून उपस्थितांची मने जिंकली होते. उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात परंतु, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपले मत मांडले होते.

 

‘अनाथ आश्रमातली सारी मुले उद्या माझ्या गँगमध्ये असतील’, असे वक्तव्य उदयनराजेंनी यावेळी केले होते. या आश्रमशाळेमध्ये उदयराजेंच्या हस्ते ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.

 

'आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे. आय लव्ह यू ऑल…मनापासून…रिअली…एवढच सांगतो अजून काय बोलू, आय लव्ह यू ऑल…' या त्यांच्या वक्तव्याने अनेकांचा मनाचा ठाव घेतला होता.

 

पुढील स्लाइड क्लिक करून पाहा... खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी माहिती आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...