आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे ‍जिल्ह्यातील कासुर्डी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.गणेश झुंबर टेमगिरे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.आदिनाथ विनायक जगदाळे (रा.भरतगाव, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल  दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवार) मध्यरात्रीच्या सुमारास गणेश तेमगिरे या तरुणाची अज्ञात मारेकर्‍यांनी डोक्यात लोखंडी गज, लाकडी दांडक्याने वार करण्यात आले आणि नतर दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.   पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

 

पुढील तपास पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत. पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हा खून काही ओळखीच्याच लोकांनी केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...