आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पुण्यात गुन्हेगारी वाढली...कामशेत परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या Murder In Pune Kamshet

पुण्यात गुन्हेगारी वाढली...कामशेत परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मावळ तालुक्यातील कामशेत मध्ये डोंगराच्या पायथ्याशी 25 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून अज्ञातांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी कामशेत पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली बाबाजी गरुड (वय-28, रा.भाजगाव, ता.मावळ) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कामशेत मधील भाजगाव परिसरातील डोंगराच्या पायथ्याला मोकळ्या जागेत अज्ञात इसमांनी 24 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून केला आहे. युवकाच्या डोक्यावर आणि पाठीवर दगड़ाने वार करम्यात आले असून डोंगर पायथ्याच्या मोकळ्या जागेत मृतदेह फेकण्यात आला आहे.

 

मृताच्या अंगावरचे कपडे काढून घेतले आहेत. अद्याप मृतकाची ओळख पटलेली नसून हत्येचे  कारण अस्पष्ट आहे. यासंदर्भात कामशेत पोलिसात अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलिस करत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...