आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबंग खासदार म्हणून उदयनराजेंची ओळख, या घटनेने पुन्हा आले होते चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक वेगळा आदर सातारावासीयांच्या मनात आहे. दबंग खासदार म्हणून उदयनराजेंची ओळख आहे. आज (24 फेब्रुवारी) त्यांचा वाढदिवस आहे. या अनुषंगाने आम्ही अापल्याला त्यांच्याविषयी रंजक माहिती देत आहोत.

 

खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी पुणे ते सातारा असा एकाच कारमधून प्रवास केला होता. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ होती. मागील काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले हे शरद पवार व राष्ट्रवादीपासून फटकून वागत होते. उदयनराजे भाजपमध्ये जाणार, अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र, राजेंनी पवारांसोबत एकाच कारमधून प्रवास करून या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

 

शरद पवारांसारखे उत्तुंग व्यक्तीमत्त्व पुन्हा जन्माला येणार नाही. मी त्यांचा मनापासून सन्मान करतो. मी त्यांचे कौतूक करायचे म्हणून करत नाही, असेही सांगत पवारांबाबत आदर व्यक्त केला. उदयनराजेंचे वैशिष्ट्ये म्हणजे ते मनात तेच ओठात अन् तेच पोटात. त्यामुळे पवारांविषयी त्यांचे आजचे म्हणणे प्रामाणिकपणातून आलेले आहे. पण राजेंनी कधीकाळी पवार काका-पुतण्यावर जहरी टीकाही केलेली आहे. मात्र, राजेंचा स्वभाव लक्षात येता त्या त्या परिस्थितीत मनातील येईल ते बोलत असतात आणि याची चांगली माहिती पवारांना आहे. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा उदयनराजेंबाबत कधीही कठोर भूमिका घेत नाहीत.

 

कोण आहेत उदयनराजे...?
- उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आहेत. ते सातार्‍याचे खासदार आहेत.
- 2009 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. शिवसेना-भाजप युती सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महसूल राज्य मंत्रिपदही भूषवले होते.
- उदयनराजे यांच्या पत्नीचे नाव दमयंती राजे असे आहे. त्यांना एक मुलगा-मुलगी आहे. (वीर प्रताप सिंग व नयनतारा)
- राजघराण्याची सून दमयंती राजे नेहमी मुंबई आणि पुण्यातील हायप्रोफाईल पार्टीमध्ये दिसतात. उदयनराजेही अनेकदा पुण्यात असतात.

 

लोकप्रिय आहे जनतेत हा राजे-
- उदयनराजे सामान्य जनतेत खूपच लोकप्रिय आहेत. सामान्य जनता आज उदयन यांना राजे म्हणूनच पुकारते.
- खरं तर उदयनराजे एवढे लोकप्रिय आहेत की, त्यांना मते मागण्यासाठी इतराप्रमाणे प्रचार करावा लागत नाही. जनताच त्यांना आपले समर्थन जाहीर करते.
- त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, देशात मोदी लाट असतानाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 5 लाखांहून अधिक मते मिळवली होती. 2009 मध्येही ते 3 लाखांहून अधिक मतांनी जिंकले होते.
- ते सातारा भागात एवढे लोकप्रिय आहेत की, सर्वांना आपल्या कुटुंबांतील मानतात आणि छोट्या छोट्या समारंभात सामील होतात.

 

महागड्या गाड्यांचा छंद-
- महागड्या गाड्याचा शौक असलेल्या उदयन यांच्याजवळ लग्झरी कार्स आणि बाईक्सचे एक मोठे कलेक्शन आहे.
- ते जेव्हा जास्त असतात तेव्हा त्यांच्या ताफ्यात कमीत कमी 10 गाड्या नक्कीच असतात. उदयनराजे अनेकदा बुलेट किंवा बाईकवरून फिरत असतात.

 

कायम वादात राहिलेय नाव-
- उदयनराजे वादात राहिले आहेत. भाजपमध्ये असताना त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती.
- याशिवाय पोलिस अधिका-यांकडून पिस्तूल हिसकावून फोटो शूट केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.
- एका पोलिस अधिका-याला मारल्यामुळेही उदयनराजेंची नाचक्की झाली होती.
- साता-यातील शरद लेवे हत्याकांड प्रकरणात उदयनराजेंची भूमिका संशयास्पद राहिल्याचे मानले जाते.
- सातारामधील लोणंद येथील एक लघुउद्योजकाकडे 2 लाखांची मागणी केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. मात्र, ते आरोप राजकीय प्रेरित असल्याचे मानले जाते.
- 36 हजार एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरुन केला होता.

 

उदयनराजेंची दबंग स्टाईल पाहाण्यासाठी  पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...