आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या खा. वंदना चव्हाण यांचा पुन्हा मांजरीवरून शेजारणीशी वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे शेजारी राहणाऱ्या महिलेशी मांजरीच्या कारणावरून पुन्हा भांडण झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मांजरीवरून झालेल्या भांडणाचा वाद थेट पाेलिस ठाण्यापर्यंत पाेहोचला असून खासदार चव्हाण यांनी शेजारीण मेधा नावडीकर यांच्याविराेधात विश्रामबाग पाेलिसांत तक्रार दिली अाहे.   
चव्हाण अाणि नावडीकर या रामबाग काॅलनीतील यशाेधन अपार्टमेंटमध्ये राहतात. १८ जानेवारी राेजी चव्हाण या त्यांच्या फ्लॅटमधील किचनमध्ये स्वयंपाक करत असताना नावडीकर या दाेन मांजरींना किचन रूमच्या खिडकीसमाेर घेऊन अाल्या. चव्हाण यांनी त्यांना ‘तुझ्या मांजरींना किचनजवळ घेऊन येऊ नकाेस, त्या घरात येऊन नासधूस करतात’ असे सांगितले. त्यावर संतापलेल्या नावडीकर यांनी जाेरात अाेरडून ‘ए, तू दुसरीकडे जाऊन राहा’ असे सुनावले. चव्हाण यांनी तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नावडीकर या काहीही ऐकण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे चव्हाण यांनी नावडीकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यापूर्वीही चव्हाण आणि नावडीकर यांच्यात मांजरीवरून वाद झाला होता. दरम्यान, नावडीकर यांच्याकडे जवळपास ५० पाळीव मांजरी असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...