आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात नाल्या शेजारील 30 वर्षे जुनी दुमजली इमारत कोसळली; 8 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंढवा परिसरातील बी.टी.कवडे रस्त्यावर केशवनगर येथे नाल्याच्या शेजारी असलेली दुमजली इमारत शनिवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेक जण अडकले आहेत. अग्निशामक दलाच्या चार गाडया तातडीने घटनास्थळी झाल्या आहेत. जवानांनी सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. जखमींना उपचाराकरिता ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात अवालेले आहे. संबंधित दुमजली इमारत ही सुभाष भांडवलकर यांचे मालकीची आहे.


सुभाष भांडवलकर हे देखील कुटुंबियासोबत इमारतीत राहात होते. या घटनेत भांडवलकर दाम्पत्य जखमी झाले आहे. इमारत 30 वर्षे जुनी होती. इमारत रिकामी करण्‍याची नोटिस पुणे महानगरपालिकेने त्यांना यापूर्वी दिली होती. मात्र, भांडवलकर यांनी इमारत रिकामी केली नाही. भांडवलकर दाम्पत्यासह भाडेकरु विनिता अशोक मोरय्या या महिलेसह आणखी भाडेकरु एक महिला व दोन मुले जखमी झाले आहेत. ढिगार्‍याखाली एक लहान मुलगा व दोन ते तीन गाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्याकरिता अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

क्रेनच्या सहाय्याने इमारत पडलेल्या जागेवरील स्लॅब बाजूला काढण्याचे काम करण्यात आले. सदर घटना घडल्यानंतर नागरिकांनी मोठया प्रमाणात घटनास्थळी गर्दी केल्यावर पोलीसांनी गर्दीला बाजूला करत बचावकार्य केले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...