आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 दिवसांनी जबडा बंद झाला आणि आजी हसल्या...सहयाद्री हॉस्पिटलच्या उपचाराला यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जांभई देताना उघडलेल्या जबडयाचा सांधा निखळल्याने तोंडच बंद न करता येणाऱ्या 83 वर्षांच्या आजींनी तब्बल चाळीस दिवसांनी आज तोंड बंद केलंय! पुण्यातील वृंदा परांजपे आजींची ही कहाणी आहे. ही कुठली तपश्चर्या नव्हती तर बिचार्‍या आजींच्या सांध्यात दोष असल्याने साधी जांभई देतांना त्यांचा जबडा जो निखळला तो बंद होऊ शकलाच नाही.

 

अर्थात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जवळपासच्या डॉक्टरांकडे नेलं ,पण दुर्दैवाने उपचार होऊ शकले नाहीत. आजींना तर बोलताच येत नव्हतं पण नातेवाईकांचा असा समज झाला की आता सर्व ठीक आहे. असे जवळजवळ चाळीस दिवस लोटले. आता मात्र आजींना अन्न जाईना, पाणीही उलटून पडू लागलं, प्रचंड थकवा आला तेव्हा मात्र नातेवाईकांची धावपळ सुरू झाली.

 

सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ सुश्रूत बडवेंनी ही केस तत्काळ मँक्झिलोफेशियल सर्जन डॉ दत्तप्रसाद दाढेंना दाखवली. निखळलेला जबडा बसवणे हे मँक्झिलोफेशियल सर्जनचे नेहमीचे काम आहे व ते काही मिनिटांत कुठलीही भूल न देता बाह्यरूग्ण विभागातही करता येते. परंतु इथे चित्र गंभीर होतं. वय त्रैंशी वर्ष शिवाय चाळीस दिवस जबडा निखळलेल्या अवस्थेत असल्याने स्नायू पूर्ण ताठरलेले होते. अतिशय अशक्त झालेल्या करूणास्पद अवस्थेतल्या आजींना डॉ.दाढेंनी धीर दिला आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पूर्ण भूल देऊन सांधा बसविण्याची तयारी केली.

या वयात व अशा अशक्त अवस्थेत पूर्ण भूल देणं धोक्याचं होतं ,परंतु भूलतज्ञ डॉ वंदना घुडेंनी हे आव्हान स्विकारले. सुदैवाने जबडा जागेवर बसवून विशिष्ट प्रकारच्या इलास्टिकने तोंड बंद करण्याची शस्त्रक्रिया डॉ दाढेंनी त्वरित पूर्ण केली व आजी सुखरूप घरी परतल्या.

 

तब्बल चाळीस दिवसांनी त्यांना नीट पाणी पिता येत होतं .त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता व सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांना कर्तव्यपूर्तीचं विलक्षण समाधान वाटत होतं..

बातम्या आणखी आहेत...