आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, महापौरांसह 2 नगरसेवकांचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील महापौर नितीन काळजे यांच्यासह दोन नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे आपला राजीनामा दिला.

 

स्थायी समितीच्या अर्ज भरण्याच्या वादावरुन शहरात राजकीय भूकंप आला आहे. शहराच्या स्थायी समिती सभापतीपदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल. आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन आपण महापौरपदाचा राजीनामा देत असल्याचे नितीन काळजे यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...