आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार वाड्यावरचा ‘आवाज बसला’ नाही; खासगी कार्यक्रमांच्या बंदीचा निर्णय PMC कडून स्थगित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ब्रिटिशांना धारेवर धरणारी भाषणे जिथून झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे रणशिंग जिथून फुंकले गेले, आणीबाणीच्या विरोधात जिथून हुंकार उमटला यासारख्या अनेक ऐतिहासिक सभांचा साक्षीदार असलेल्या शनिवार वाड्यात यापुढे खासगी कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने शुक्रवारी घेतला होता. परंतु शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने काही तासांत स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता.

 

पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य होणे बाकी होते. परंतु त्याआधीच प्रशासनाने या निर्णयावर स्थगिती आणली आहे.

 

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता.

 

शनिवार वाडा मिळतो भाडे तत्त्वावर

शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. सध्या अडीच हजार रुपये भाडे आकरण्यात येते. मात्र, वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. तसेच कार्यक्रमानंतर पसिरात प्रचंड अस्वच्छता पसरते. यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच म्हटले होते.

 

ऐतिहासिक संदर्भ

- ब्रिटिशकालीन रे मार्केटचे बांधकाम 1886 मध्ये पूर्ण झाले. त्याआधी पुण्यातला मंडई-बाजार शनिवारवाड्याच्या पटांगणातच भरायचा.

- स्वा. सावरकर, कॉम्रेड डांगे, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, पु. ल. देशपांडे, शरद पवार, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदींनी आपल्या सभांनी शनिवारवाडा पटांगण गाजवले आहे.

 

सर्वसाधारण सभेपुढेच निर्णय व्हायला हवा
सुरक्षा व वाहतूक कोंडीच्या कारणामुळे शनिवारवाडा पटांगणात जाहीर कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असे पत्र पोलिसांनी दिले आहे. त्याला अनुसरून आयुक्तांनी बंदीचे आदेश काढले होते.  परंतु, हा निर्णय सर्वसाधारण सभेपुढे व्हायला हवा होता. शनिवारवाडा पटांगणातील कार्यक्रमासंदर्भातले यापूर्वीचे निर्णयही सभेनेच घेतले होते.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे.

बातम्या आणखी आहेत...