आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्रापुरच्या जंगलात पोलिस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येची घटना ताजी असताना पुण्यात एका पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

पुण्यातील शिक्रापूर हद्दीत जंगलात पोलिस कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.  या घटनेचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर होत आहे. प्रल्हाद सातपुते हे रविवारी दिवस पाळीसाठी कामावर होते. त्याचा मृतदेह पोलिस वर्दीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 

प्रल्हाद सातपुते यांच्या कौटुंबिक वादामुळे त्रस्त होते. त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील त्यांना नैराश्य येत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आत्महत्या मागे नेमके कारण काय याचा तपास पोलिस करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...