आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्ये खासगी बसने अचानक घेतला पेट; मोठा अनर्थ टळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रहाटणी येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

 

मिळालेल्या महितीनुसार, थेरगावमधील क्रांतीनगर परिसरात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खासगी बसने अचानक पेट घेतला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रहाटणी परिसरातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगेवर नियंत्रण मिळवले आहे. परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आग लागण्याचा कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेचा लाइव्ह व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...