आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- राहाटणी परिसरात एक महिण्यापूर्वी बस चालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ही हत्या मित्राने अवघ्या 800 रुपयांसाठी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे. पवन ऊर्फ अनिल रमेश सुतार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मित्र अनिल श्रावण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
16 जुलैच्या रात्री राहाटणी परिसरातील एका बसमध्ये पवन उर्फ अनिल सुतार याची अज्ञात व्यक्तीने हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह हा बसमध्ये आढळला होता. याप्रकणी तब्बल एका महिन्यानंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा झाला. आरोपीने हत्येची कबुली दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पवन सुतार आणि अनिल मोरे हे दोघे मित्र होते. दोघेही सुतार काम करत होते. अनिल हा एका खासगी बसवर चालक म्हणूनही काम करत होता. काही महिन्यांपूर्वी दोघांनी केलेल्या सुतार कामाची मजुरी पवन याने घेतली. त्यापैकी आठशे रुपये अनिलला न देता पवनने स्वतः खर्च केले. दोघे दारूची पार्टीही एकत्रच करत होते. एवढेच नाही तर दोघे एकच मोबाइल वापरत होते. मात्र, उसण्या पैश्यावरून पवन आणि अनिल यांच्यात कायम वाद होत होते. त्यानंतर अनिलने पवनच्या मोबाइलमधील मेमरीकार्ड गहाण ठेऊन दारूची पार्टी केली. त्यानंतर पवनने मेमरीकार्ड परत मागितल्यावर अनिलने टाळाटाळ केली, या कारणांवरून दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. 16 जुलैच्या रात्री पवन बसमध्ये झोपला होता. अनिलने धारदार शस्त्रने पवनची निर्घृण हत्या केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.