आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • घुंडरे पाटलांची नवी देखणी बैलजोडी वाहणार माऊलींच्या पालखीरथाचा भार Pune Ghundare Patils Bullock Will Carry To Mauli Palakhi Rath

खेड तालुक्यातील घुंडरे पाटलांची नवी देखणी बैलजोडी वाहणार माऊलींच्या पालखीरथाचा भार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखीरथ वाहण्याचा मान यंदा खेड तालुक्यातील घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीला मिळाला आहे. सर्जा आणि राजा अशी पारंपरिक नावे असणारी घुंडरे पाटील यांची देखणी बैलजोडी हा मान मिळाल्याने गावकऱ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.

 

माऊलींचा पालखी सोहळा यंदा 6 जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर 21 दिवसांनी हा सोहळा आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथे प्रवेश करेल. या संपूर्ण  प्रवासात माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान असतात आणि ही पालखी रथामध्ये ठेवलेली असते. हा रथ ओढण्याचा मान दरवर्षी मानकऱ्यांना दिला जातो. यंदा खेड तालुक्यातील  आळंदी देवाची येथील रामकृष्ण घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीला माऊलींचा रथ वाहण्याचा मान मिळाला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा..अशी आहे घुंडरे पाटलांची बैलजोडी...

बातम्या आणखी आहेत...