आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात, \'ससून\'च्या डॉक्टरांना काळे फासण्याची धमकी, गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांना काळे फासण्याचा त्यांनी इशारा दिला होता. नंतर त्यांच्या ‍विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. तृप्ती देसाई यांनी गुरुवारी कात्रजमधील राहात्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

काय आहे प्रकरण?
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन केली होती. डॉ.चंदनवाले यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही त्यांनी द‍िला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन देसाई यांना अटक केली.

 

डॉ.चंदनवाले जळगावचे...

डॉ. अजय चंदनवाले हे असल्याले भाजप नेते एकनाथ खडसे आणि आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा त्यांना वरदहस्त आहे. त्यामुळे ते मागील 7 वर्षांपासून एकाच पदावर काम करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असेही देसाई यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...