आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके प्रकरणात 6 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र; 2091 कोटी रुपयांची फसवणूक निष्पन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याच्यासह एकूण सहाजणांविरोधात 1600 पानी पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या कोर्टात सादर केले आहे. सुमारे 35 हजार गुंतवणूकदार आणि बॅंकेची मिळून एकूण 2091 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांनी दिली आहे.

 

शिरीष कुलकर्णी याच्यासोबत डीएसके यांच्या भावाचा जावर्इ केदार वांजपे, त्याची पत्नी सर्इ वांजपे, मेहुणी अनुराधा पुरंदरे, डीएसके कंपनीचे सीर्इओ धनंजय राजाभाऊ पाचपोर, फायनान्स अधिकारी विनयकुमार राघवेंद्र बाडगंडी यांच्या विरोधात सदर 1600 पानी पुरवणी दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. यामध्ये मूळ दोषारोपपत्र 163 पानी असून पोलिसांनी प्रथमच कोर्टात कागदोपत्री दोषारोपपत्र सादर न करता, प्रत्येक आरोपी विरोधातील दोषारोपपत्र स्वतंत्र पेनड्रार्इव्ह मध्ये सॉफ्ट कॉपीत सादर केले आहे. 17 मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेने डी एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह एकूण 13 जणांविरोत 37 हजार पानी दोषारोपपत्र कोर्टात सादर केले होते. यामध्ये डीएसके यांनी नऊ कंपन्याच्या माध्मयातून गुंतवणूकदार, बॅंका, कर्जरोखे व जमिन व्यवहार यामाध्यमातून 2043 कोटींची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

 

संबंधित आरोपींविरोधात पोलिसांनी भादंवि कलम 420, 406, 409, 467,468, 471, 411, 34, 120 (ब), एमपीआयडी कलम 3 व 4 तसेच प्रार्इज चिट अॅन्ड मनिसर्क्युलेशन (बर्निंग) अॅक्ट 1978 चे कलम 3,4,5,6 तसेच आरबीआय 1934 चे कलम 45 'एस'नुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींनी पैशांचा अपहार कशाप्रकारे केला तसेच ठेवींच्या स्वरुपात स्विकारलेल्या पैशांचा गैरव्यवहार कुठे केला याबाबत पोलिसांनी तपास करुन त्याबाबतची माहिती कोर्टात दिली आहे. फुरसुंगी येथील जमीन नातेवार्इकांच्या नावावर कवडीमोल भावात घेऊन ती जादा दराने डीएसके कंपनीकडे हस्तांतरित कशाप्रकारे करण्यात आली आणि बॅंकांची कर्ज रक्कम कुठे खर्च केली याबाबत अद्याप तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...