आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2018 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ 2018 ज्येष्ठ गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या गायन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कार्थी प्रभा अत्रे रांना गौरविण्यात येणार आहे. पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे.

 

पंडीत हरिप्रसाद चौरसिया, पंडीत अमजद अलीखान, पंडीत जसराज, पंडीत शिवकुमार शर्मा ह्यांसारख्या त्याच क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

पुरस्काराचे यंदाचे 30 वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, बलबीर सिंग, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनीता अशोक कामटे (कै.अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दिनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... काय आहे पुण्यभूषण पुरस्कार इतिहास?