आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: हिंजवडी IT पार्कमधील हायटेक Sex Racket चा पर्दाफाश, सात तरुणींची सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागातील आयटी पार्कमध्ये सोशल मीडियाद्वारे चालणार्‍या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडीमधील एका इमारतीत छापा मारुन सात मुलींची सुटका केली तर पाच जणांना अटक केली आहे.

 

कुमार बालबहादूर प्रधान (47), रणजित बालबहादूर प्रधान (वय 25, दोघेही रा. मुकाईनगर, हिंजवडी ) शामसुंदर गंगाबहादूर नेवार (वय 23), बळीराम भक्ती शर्मा (वय 22) आणि बळीराम फोन गौर (वय 22, तिघेही रा. आसाम) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एक आरोपी असून अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

हिंजवडीमधील आयटी पार्कमध्ये व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाद्वारे देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गणेश मंदिर परिसरातील इमारतीमधील एका फ्लॅटवर छापा मारला. पोलिसांनी पाच दलालांना अटक केली असून सात तरुणींची सूटका केली आहे. सर्व महाराष्ट्रासह इतर राज्यातील आहेत. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क करत होते. मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवून ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम ते करत होते. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हिजवंडी परिसरात उच्च उच्च शिक्षित लोक राहातात. त्यामुळे येथे वैश्या व्यवसाय देखील हायटेक पद्धतीने सुरू होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...