Home | Maharashtra | Pune | Raj Thackeray Comment On Muslim Community For Namaaz

राज ठाकरे म्हणाले, धर्म घरात सांभाळावा, नमाजाला कशाला पाहिजेत लाऊडस्पिकर?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 28, 2018, 06:16 AM IST

. मुसलमानांना नमाजाला कशाला पाहिजेत लाऊडस्पिकर? कोणाला कळवायचे असते? नमाज घरात पढावा.

 • Raj Thackeray Comment On Muslim Community For Namaaz

  पुणे- प्रत्येकाने आपला धर्म घरात सांभाळावा. दुसऱ्या धर्माने तिसऱ्या धर्माला काही सांगू नये, असे महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. मनसेच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज्यभरात मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे, त्यावर राज यांनी भाष्य केले. तसेच शिवसेनासह भाजपवर कडाडून टीका केली.

  हेही वाचा..सत्ताधारी- विरोधक तुम्हाला वापरून घेत आहेत, सतर्क राहा; पुन्हा ‘काकासाहेब शिंदे’ घडू नये- राज

  सतर्क राहा...सगळेच तुम्हाला वापरून घेतात.

  कौनसी जात के हो, हे ज्याने-त्याने विचारले पाहिजे असली परिस्थिती आणायची आहे का? महाराष्ट्राचा युपी-बिहार करायचाय काय? सत्तेत बसलेले आणि विरोधातील हे सगळेच तुम्हाला वापरून घेतात. सतर्क राहा. बेसावध राहू नका. या महाराष्ट्रात पुन्हा काकासाहेब शिंदे घडता कामा नये. सत्ताधारी- विरोधकांसाठी माझ्या महाराष्ट्रात पुन्हा कोणाचा जीव जाता कामा नये, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.

  मुसलमानांना नमाजाला कशाला पाहिजेत लाऊडस्पिकर?

  गुजराती समाजाच्या पर्युषण पर्वाचा उल्लेख करुन राज ठाकरे यांनी सांगितले की, कत्तलखाने बंद करण्याचे फतवे काढणे बंद करा. गटारीला आम्ही सांगतो का, ‘घे. कम्पलसरी आहे.’ हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुसलमानांना नमाजाला कशाला पाहिजेत लाऊडस्पिकर? कोणाला कळवायचे असते? नमाज घरात पढावा. रस्ते का अडवता? प्रत्येकाने हे सांभाळले तर देशाला चिंता करावी लागणार नाही. अन्यथा एकाने चूक केली की सगळे करतात.

  सत्ताधारी तुमच्या भावनांशी खेळत आहेत...

  सरकारी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी आपण भांडतो आहोत. पण आरक्षणाच्या मुद्यावरची वस्तुस्थिती कोणीही सांगत नाहीत. आधीचे आणि आताचे सत्ताधारी तुमच्या भावनांशी खेळत आहेत. त्यांना फक्त तुम्हाला खेळवायचे आहे. यातून तुमच्या हाती काहीच लागणार नाही ही गोष्ट शांतपणे समजून घेतली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे व्याख्यान दोन आठवड्यांपूर्वी ज्या सभागृहात झाले त्याच ठिकाणी ठाकरेंची सभा झाली. मात्र, ठाकरेंच्या सभेला शहांच्या सभेच्या तुलनेत जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. यात तरुणांची संख्या सर्वाधिक होती.

Trending