आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक..विद्येचे माहेरघरात स्कूल बस चालकाकडून 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्कूल बसमध्ये शाळेत जात असलेल्या एका आठ वर्षाच्या चिमुरडीवर स्कूलबस चालकानेच तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास बाळू तिकोणे (रा.पाटण, ता.मावळ,) असे आरोपीचे नाव आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, 16 ऑगस्टला पीडित मुलगी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाळेतून स्कूलबसने (एमएच14-सी.डब्ल्यु 4709) घरी जात होती. त्यावेळी स्कूलबस चालक विकास तिकोणे याने कार्ला फाटा ते मळवली यादरम्यान तिच्यावर बलात्कार केला. याबाबत ‘तू कोणालाही काहीही बोलू नकोस नाहीतर, मी तुला मारीन व माझे स्कूलबसमधून पुन्हा शाळेत घेऊन जाणार नाही’, अशी धमकी आरोपीने पीडित मुलीस दिली होती.

 

मुलीला घराजवळ आरोपीने सोडल्यानंतर, मुलीने घडलेला सर्व प्रकार आर्इला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आर्इने पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 3 (इ) सह 4 सह 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...