आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पणजीजवळ झाेपलेल्या एक वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  तामिळनाडू येथून कामाच्या निमित्ताने लाेणी काळभाेर परिसरात लाेणी स्टेशन येथे झाेपलेल्या कुटुंबातील एक वर्षाच्या चिमुरडीला पळवून नेत बलात्कार करून तिचा खून करण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. पाेलिसांनी याप्रकरणी अवघ्या तीन तासांत आरोपीला अटक केली अाहे. मल्हारी हरिभाऊ बनसाेडे (२२, रा. लाेणी काळभाेर, पुणे) असे  त्याचे नाव असून विकृतीतून कृत्य केल्याची कबुली दिली.

 
या प्रकरणी मुलीच्या ६५ वर्षीय पणजीने पाेलिसांत तक्रार दिली हाेती.  त्या तामिळनाडूतील वेल्लूर जिल्ह्यातील असून मजुरी कामाकरिता ती कुटुंबासह लाेणी काळभाेर स्टेशन येथे अाली हाेती. अापल्या परिवारासाेबत ती गुरुवारी रात्री झाेपली असताना, रात्री साडेनऊ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान तिच्या नातीची एक वर्षाची लहान मुलगी काेणी तरी पळवून नेली. हे लक्षात अाल्यावर मधयरात्रीपर्यंत तिचा सर्वत्र शाेधाशाेध घेऊन तपासणी करण्यात अाली. मात्र, ती सापडली नाही. अखेर पाेलिसांकडे याबाबत तक्रार दिली. मात्र, अंधारामुळे तपासात अडथळे येत हाेते. अखेर शुक्रवारी पहाटे मुलीचा मृतदेह पाेलिसांना सापडला. शवविच्छेदन केल्यानंतर या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे सिद्ध झाले. पाेलिसांनी तातडीने अाराेपीच्या शाेधासाठी काही पथके पाठवली. तांत्रिक पुरावे गाेळा करून पाेलिसांनी अाराेपीची माहिती काढली असता ताे स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याचा लाेणी काळभाेर परिसरात शाेध घेऊन त्यास जेरबंद करण्यात अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...