आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात चंदनाची तस्करी...10 कोटी रुपयांचे रक्तचंदन पकडले, वाकड पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवड येथे कोट्यावधी रुपयांच्या चंदनाची तस्करी करणार्‍यांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी 10 कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त केले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथील एका धाब्यावर थांबलेल्या कंटेवरमध्ये 10 टन चंदन होते. वाकड पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

सूत्रांनुसार, सातार्‍याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरमधून चंदनची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून पुनावळे येथील एका धाब्यावर कंटेनर थांबवून विश्रांती घेणार्‍या चालकालासह त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंटेनरमध्ये काचेच्या बाटल्या आहेत. तसेच कंटेनरमध्ये 10 कोटी रुपयांचे 10 टन रक्तचंदन असल्याचे आढळून आले आहे. कंटेकर चालक हा तामिळ असून चंदनाची तस्करी परराज्यात होत असण्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

 

रक्तचंदन हे मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांसाठी वापरले जाते. कर्नाटकमध्ये रक्तचंदनची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. याप्रकरणी वाकड पोलिस तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा... पोलिस कारवाईचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...