आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सखाेल तपास करून स्फाेटाचे सूत्रधार पकडा; संजय नहार यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अहमदनगरच्या येथील मारुती कुरिअरच्या कार्यालयात मंगळवारी रात्री एका पार्सलचा स्फाेट हाेऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली हाेती. नगरच्या एका व्यक्तीने पुण्यातील सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या नावाने संबंधित पार्सल घातपात घडवण्याच्या उद्देशाने पाठवल्याचे पाेलिस तपासात समाेर अाले अाहे. नहार यांनी याप्रकरणी बुधवारी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात पाेलिसांशी चार तास चर्चा करून सूत्रधाराला पकडण्याची मागणी केली. 

 

दरम्यान, पाेलिसांनी नहार यांना नेमका काेणापासून धाेका अाहे, धमकीबाबत कुणाचे फोन आले ? हे आणि इतर प्रश्न विचारले.   


नहार म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी तसेच हिंसाचारग्रस्त भागातील लाेक देशाच्या मुख्य प्रवाहाशी जाेडले जावे या उद्देशाने मागील अनेक वर्षांपासून सरहद संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील अाहे. सरहदमध्ये काश्मीरमधील १५० विद्यार्थी शिक्षणासाठी असून कारगिल युद्धातील ३८ जणांचा यात  समावेश अाहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, र्इशान्य भारतात सरहद संस्था काम करत असून ज्यांना शांतता नकाे अाहे किंवा संस्थेचे काम अडचणीचे वाटते ते अशा प्रकारचे कृत्य करू शकतात. या प्रकरणात माझा काेणावरही संशय नसल्याचे ते म्हणाले.

 

हेही वाचा..अहमदनगरात कुरिअर पार्सलचा स्फोट; वाचा कोण आहेत संजय नहार?

 

कोण आहेत संजय नहार?

संजय नहार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कानूर पठार येथे झाला. बीएस्सीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक कामाची आवड असल्याने त्यांनी ‘वंदे मातरम’ संघटनेच्या माध्यमातून काम केले. धार्मिक विद्वेष बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित येऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करावे या उद्देशाने त्यांनी हिंसाचारग्रस्त भागात काम करण्यास सुरुवात केली.

 

१९८३ मध्ये पंजाबमधील बल्यू स्टार प्रकरणानंतर घडलेल्या हिंसाचारवेळी शांततेसाठी काम केले. विविध क्षेत्रातील अनेक वरिष्ठ लोकांशी त्यांनी याकाळात चांगले संबंध प्रस्थापित केले. गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान या गावी संत नामदेव यांनी २३ वर्ष मुक्काम केल्याने त्यांनी हा धागा पकडून पंजाब आणि महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. त्याच माध्यमातून घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत वाढ झाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली. १९९५ मध्ये सरहद संस्थेची स्थापना करून अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी जम्मू-काश्मीर भागात वास्तव्य करुन त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केला. काश्मीर मधील मुलांना देश समजावा या उद्देशाने त्यांनी ‘भारताची ओेळख’ नावाने उपक्रम सुरू करत मुलांना देशातील विविध शहरात पर्यटनास फिरवले. सरहदच्या माद्यमातून पंजाब, जम्मू-काश्मीर, र्इशान्य भारतातील मुलांना शिक्षणासाठी त्यांनी पुण्यात कायमस्वरुपी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...