आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदोरीत दरोडा टाकणारे सात दरोडेखोर गजाआड; आरोपींना केली पुणे शहरातून अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुशाहीद जावेद खान - Divya Marathi
मुशाहीद जावेद खान

पुणे- तळेगाव दाभाडेजवळ इंदोरी गावच्या हद्दीत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांनी अचानक ट्रक अडवून चालकाला गुंगीचे औषध देऊन 49 लाखांचा ऐवज लंपास केलेल्या सात दरोडेखोरांच्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

 

संदीप दादासाहेब झिरपे (वय- 25, रा.तळणी, ता.शेवगाव, जि.नगर) नागेश अंकुश महाडीक (वय- 25) अनिल भाऊसाहेब इंगवले (वय- 20, रा.सांगोला, जि.सोलापूर) अमरनाथ भैरुदेव बाबर (वय-25, रा.चिक मोहदक, ता. सांगोला, जि.सोलापूर) सागर राजू माने (वय-24, रा.शिवतेजनगर केपीआयटी कंपनी शेजारी हिंजवडी, पुणे) समर्थ सतीश शिंदे (वय-22, रा.लक्ष्मी चौक, बुचडे वस्ती, हिंजवडी,पुणे) मुशाहीद जावेद खान (वय-23, रा.गांधीनगर भाऊ पाटील रोड, बोपोडी पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

 

सूत्रांनुसार, भंडारा डोंगर पायथा येथे चाकण तळेगाव रोडवरुन फिर्यादी हे त्यांचे ताब्यातील ट्रकमधून क्लोराईड मेटल लिमिटेड कंपनी मरकळ,यांचे ऍलोय (सिसे लीड) चे 960 नग (24 बंडल) किंमत- 48,91,701रुपयांचा माल घेऊन चालले असता 7 आरोपीनी फिर्यादीस तीन मोटार सायकलवर येऊन अडविले. ट्रक थांबवून फिर्यादीस हाताने मारहाण करून गुंगीचे औषध तोंडाला लावून बेशुद्ध केले. हातपाय बांधून ट्रकसह संपूर्ण माल तसेच लावा कंपनीचा मोबाइल, रोख रक्कम असा माल चोरून नेला होता. पोलिस पथकाने गोपनीय माहिती काढून पुणे शहर परिसरातून आरोपींना ताबात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. या घटनेतील अटक केलेल्या आरोपींवर शहरात इतर ठिकानिंदेखील गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पोलिसांनी गजाआड केलेले दरोडेखोरांचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...