आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पुण्यात 60 वर्षीय महिलेला बेशुद्ध करून नराधमाने केला लैंगिक अत्याचार Sexual Harassment In Pune On 60 Years Old Women

पुण्यात 60 वर्षीय भिक्षेकरी महिलेला बेशुद्ध करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात 60 वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी  रात्री अकराच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे घडली.

 

पीडित महिला पार्किंग शेडमध्ये राहात होती. तिच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तिला बेशुद्ध करून एका तरुणाने तिच्यावर अत‍िप्रसंग करण्‍याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात होता. तितक्यात परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. नंतर त्याला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

विजय लुलु बोंगा (वय-21, रा.गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खुनचा प्रयत्न आणि बलात्कार या कलमांनुसार एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...