Home | Maharashtra | Pune | Maratha Reservation.. Shivaji Maharaj Birth Place Band, Both of them went on electric tower

मराठा आरक्षणासाठी शिवरायांच्या जन्मभूमीत कडकडीत बंद..बेल्हे गावात आंदोलक इलेक्ट्रीक टॉवरवर चढले

प्रतिन‍िधी | Update - Aug 01, 2018, 04:28 PM IST

शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

  • पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुसरीकडे, बेल्हे गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. दोन तरूण थेट इलेक्ट्रीक टॉवरवर चढले आहेत.

    कैलास औटी आणि शरद औटी असे टॉवरवर चढलेल्या आंदोलकांची नावे आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तरुणांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

    दरम्यान, बुधवारी मराठा आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा बेल्हे गावात दोन मराठा आंदोलन चढले इलेक्ट्रीक टॉवरवर...

Trending