आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • नमाझनंतर डोक्याला रुमाल बांधून ऑफिसमध्ये आला सॉफ्टवेअर इंजीनिअर, कंपनीने केले Terminate Software Engineer Kicked From Job After He Refused To Wear Hanky On Head

नमाजनंतर डोक्याला रुमाल बांधून ऑफिसमध्ये आला सॉफ्टवेअर इंजीनिअर, कंपनीने केले TERMINATE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नमाज अदा केल्यानंतर डोक्याला रुमाल बांधून ऑफिसमध्ये आलेल्या सॉफ्टवेअर इंजीनिअरला आपली नोकरी गमवावी लागली आहे. कंपनीने त्याला तडकाफडकी बडतर्फ केले आहे. पुण्यातील मगरपट्‌टा भागातील एका एमएनसी कंपनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

'पुणे मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बडतर्फ करण्‍यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजीनिअरचे नाव अमन खान असे आहे. तो पुण्यातील कॅनडा बेस कंपनी नोकरी करत होता. अमन खान याने सांगितले की, शुक्रवारी तो नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेला होता. ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याने डोक्याला रुमाल बांधलेला होता. हे पाहून त्याचा मॅनेजर किशोर कोटेचा यांनी त्याला आपल्या कॅबिनमध्ये तातडीने बोलावून घेतले. मॅनेजर महोदयांनी अमनची चांगलीच कान उघाडणी केली. एवढेच नाही तर त्याच्यावर धर्माबाबत टीका करत त्याला थेट नोकरीवरून बडतर्फ केले. अमनने या प्रकरणी थेट लेबर कमिश्नरची भेट घेऊन कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे.

 

कॅनडाची कंननी एक्सफोमध्ये टेक लीडर पदावर अमन काम करत होता. 6 एप्रिल रोजी तो दुपारी नमाज अदा करण्‍यासाठी मशिदीत केला होता. नंतर तो ऑफिसमध्ये आला, परंतु डोक्याला बांधलेला रुमाल सोडणे तो विसरला. त्यावर मॅनेजरने कॅबिनमध्ये बोलावून धर्माबाबत उलटसूटल ऐकवले. तसेच नोकरीवरून बडतर्फही केले, असे अमन याने तक्रारीत म्हटले आहे.

 

एक्सफोमध्ये समानता..

दुसरीकडे, 'एक्सफो'चे प्रवक्ता कृष्ण मूर्ति यांनी सांगितले की, 'कंपनी सर्व कर्मचार्‍यांमध्ये समानता आहे. धार्मिक मूल्यांचे पालन करण्‍याची सर्व कर्मचार्‍यांना स्वातंत्र्य आहे. कंपनी कर्मचार्‍यांमध्ये भेदभाव करत नाही.'

 

अपर लेबर आयुक्त निखिल वाळके यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी सुरु आहे. कंपनीला 29 जूनच्या बैठकीत बोलवण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास कंपनीवर कारवाई केली जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...