आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चाय ला...!\' सायन्स ग्रॅज्युएटचा तंदूर चहा पुण्यात हिट, 13 राज्यांत सुरु करणार चेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- तुम्ही तंदूर चिकन किंवा तंदूर रोटीचा आस्वाद घेतला असेल. परंतु पुण्यात 'चाय ला' नामक रेस्तराँमध्ये तंदूर चहा मिळतोय तो ही केवळ 20 रुपयांत. तंदूर स्मोक फ्लेवर असलेल्या या चहाने अल्पावधीत पुणेकरांना आपला दीवाना केले आहे.

 

बीएस्सी ग्रॅज्युएट असलेले अमोल दिलीप राजदेव आणि प्रमोद बनकर या दोघांनी       खराडी भागात 'चाय ला' हे टी शॉप सुरु केले आहे. अवघ्या दोन महिन्यात तंदूर चहा पॉपुलर झाला आहे. देशातील 13 राज्यांत टी शॉप चेन सुरु करण्याचा मानस दोघांनी व्यक्त केला आहे.

 

असा तयार होतो तंदूर चहा...

- अमोल आणि प्रमोदच्या 'चाय ला, द तंदूर टी' नामक रेस्तराँमध्ये खास तंदूर चहा बनतो.
- अमोलने सांगितले की, तंदूर चहा बनवण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. एका मोठ्या तंदुरमध्ये (भट्‍टी) विशिष्ट प्रकारची मातीची मडकी गरम केली जातात. त्यानंतर तयार केलेला चहा मडक्यात ओतला जातो. त्यामुळे चहाला मातीच्या मडक्याचा सुगंध आणि स्मोक फ्लेवर येतो. वाफाळलेला चहा मातीच्याच कुल्लडमध्ये ग्राहकांना सर्व केला जातो.

 

चहाची पेटेंट प्रक्रिया अंतिम टप्प्यात..
- प्रमोद बनकर याने सांगितले की, अल्पवधीत पॉपुलर झालेला 'चाय ला' टी शॉपमधील तंदूर चहाचा ट्रेडमार्क आणि पेटेंट प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत पेटेंट सर्टिफिकेट आम्हाला मिळेल.
- दिवसभरात 1200 कप चहाची विक्री होते. वीकेंडला हा आकडा 2000 च्या वर जातो असे प्रमोदने सांगितले.
- तंदूर चहासोबतच चाय ला टी शॉपमध्ये तंदूर कॉफी, ब्लॅक कॉफी, मसाला चहा, लिंबू चहा, ब्लॅक टी, आल्याचा चहा आणि हळदीचे दूध ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाते.
- ग्राहकांची मागणी लक्षात घेत चहासोबत स्नॅक्स ठेवण्यात आला. येथील बन मस्का आणि बन जाम देखील प्रचंड फेमस आहे.

 

अशी सुचली 'तंदूर चहा'ची आयडिया
- 'चाय ला' रेस्तराँ व्यतिरिक्त अमोलचे पुण्यात एक महाराष्ट्रियन रेस्टोरेंट  देखील आहे. 'चाय ला' सकाळी 6 वाजता सुरु होते आणि रात्री 11 वाजता बंद होते.
 - अमोलने सांगितले की, 2017 मध्ये हिवाळ्यात तो आजारी पडला होता. घराच्या अंगणात तो शेकोटी शेजारी बसला होता. तेव्हा त्याची अाजी त्याच्यासाठी हळदीचे दूध घेऊन आली. आजीने आधी शेकोटीत कुल्हड गरम केले. त्यात दूध टाकले. नंतर हळद टाकली आणि ते मला प्यायला दिले. धूर आणि कुल्हडचा फ्लेवर दुधाला आला होता. यातून तंदूर चहाची आयडिया सुचल्याचे अमोलने सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पुण्यातील चाय ला रेस्तराँचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...