आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्याने एका विद्यार्थ्याला शिक्षकाने एवढी कठोर शिक्षा दिली की, त्याला थेट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्‍याची वेळ आली आहे. विद्यार्थ्याचे एक गणित चुकल्याने शिक्षकाने त्याच्या तोंडात छडी खुपसली. विद्यार्थ्यावर पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

 

ICU मध्ये उपचार सुरु...
- अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. रोहन असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे याने गणित चुकल्याने रोहनला कठोर शिक्षा दिली होती. शिक्षकाने रोहनच्या तोंडात छडी खुपल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.
- नंतर रोहनच्या घशाला गंभीर दुखापत झाली आणि तो वर्गात बेशुद्ध पडला.
- रोहनला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. नंतर त्याला बारामती येथील एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्‍यात आले. परंतु, रोहनची प्रकृतीची सुधारत नसल्याने त्याला पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

 

चौकशीचे आदेश...
- या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन गटशिक्षण अधिकारी शिंदे यांनी खुद्द पिंपळवाडी येथील शाळेत जाऊन विद्यार्थी आणि इतर शिक्षकांची चौकशी केली.
- रोहनची आई सुनीता यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात अाला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या रोहनचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...