आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: पत्नी आणि भाजपच्या नगरसेविकेविरोधात चिट्ठी लिहून पानटपरी चालकाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथील एका पान टपरी चालकाने आज (सोमवारी) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मानसिक त्रास देणारी पत्नी आणि स्थानिक नागरसेविकेविरोधात चिठ्ठी लिहून ठेवली होती. सचिन ढवळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ढवळे यांनी आपल्या राहत्या     घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीत त्याने भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे आणि पत्नी शशिकला ढवळे यांची नावे लिहिली आहेत.

 

संत तुकाराम नगरात सचिन याची पानटपरी होती. सचिनला नगरसेविका सुजाता पालांडे या मानसिक त्रास देत होत्या. त्याचप्रमाणे पत्नीही मानसिक छळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत सचिन यांची पत्नी शशिकलाने आपल्या पतीला नगरसेविका सुजाता पालांडे, सुनील पालांडे, अमय बिर्जे, विक्की शर्मा यांच्याकडून त्रास होत असल्याची लेखी तक्रार 9 एप्रिल रोजी संत तुकारमनगर पोलिस स्टेशनला दिली होती. तसेच पतीला संरक्षण देण्याची मागणी देखील केली होती. मात्र पोलिसांनी राजकीय दबावापोटी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान त्याच्यांच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये मृत सचिनच्या पत्नी शशिकला ढवळे आणि नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...