आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: मुलींनी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत; एमअायटी शाळेच्या जाचक अटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शाळा सुरू हाेत असताना प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार करत असते अाणि त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी त्याचे अनुकरण करावे, असे सूचित करण्यात येते. मात्र, पुण्यातील एमअायटी शाळेने मुलींची छेडछाड राेखण्यासाठी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत, खेळाच्या तासावेळी केवळ खेळाची अंतर्वस्त्रे घालावीत, मुलींच्या स्कर्टची लांबी गुडघ्यापर्यंतच असावी, विद्यार्थिनींनी लिपस्टिक, लिप ग्लाॅस वापरू नये, साैंदर्य प्रसाधनांचा वापर नकाे, कानातील साेडून काेणतेही दागिने घालू नये, ०.३ सेंमीच्या अाकारापेक्षा माेठे कानातील वापरू नये, त्यांचा रंग साेनेरी, चंदेरी किंवा काळा असावा, मुलांनी केस बारीक ठेवावेत, अंगावर टॅटू काढू नये, अन्यथा निलंबित केले जार्इल, पालकांनी अापसात बाेलू नये, विद्यार्थी व पालकांनी शाळेविराेधात अांदाेलन करू नये, शाळेबाहेर प्रिंट अथवा इलेक्ट्राॅनिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये, असे बजावण्यात अाले अाहे. 


अटींचा भंग केल्यास भारतीय दंड विधान संहितेनुसार फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येर्इल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अटी घालण्यात अाल्या असून त्यातील २५ जाचक अटी मान्य नसल्याचे सांगत पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर बुधवारी संताप व्यक्त केला. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालून शाळेवर कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी केली अाहे. 


पालकांना बुधवारपर्यंत शाळेने घालून दिलेल्या अटींच्या पुस्तिकेवर सही अाणणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले. त्यामुळे पालकांनी यावर अाक्षेप घेत याबाबत शाळेला पालकांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकांना शाळेच्या गेटच्या अातमध्येच येऊ न दिल्याने त्यांनी शाळेच्या प्रशासनाविराेधात राग व्यक्त केला. याबाबत पालकांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या एमअायटीच्या विश्वशांती गुरुकलअंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल व श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा अाणि एमअायटी पूर्वप्राथमिक शाळा बंद करून त्या जागी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसर्इ) सक्तीने विद्यार्थी व पालकांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा अाराेप केला अाहे. याप्रकरणी पालकांनी शिक्षण अायुक्त, शिक्षण संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यावर ५९ पालकांच्या साक्षऱ्या अाहेत. दरम्यान, हा वाद येत्या काही दिवसां आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. 


शाळेने घातलेल्या अटी... 
- मुलींनी नॅपकिन सॅनिटरी बाॅक्समध्येच जमा करावे, अन्यथा ५०० रुपये दंड अाकारण्यात येर्इल. 
- विद्यार्थ्यांनी वर्गात अन्नपदार्थ, पेपरचा कचरा केल्यास संबंधिताने ते साफ करावे. 
- कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांचा कचरा साफ केल्यास अतिरिक्त दंड लावला जार्इल. 
- शाळेने ठरवून दिलेला ड्रेसकाेड वापरण्यात यावा. 
- ठरावीक टेलरकडूनच ड्रेस शिवून घ्यावेत 
- अाधुनिक पद्धतीचे कपडे चालणार नाहीत 
- सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात शाळेच्या परवानगीशिवाय सहभागी होऊ नये 
- मुलींनी छेडछाड राेखण्यासाठी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत 
- खेळाच्या तासावेळी केवळ खेळाची अंतर्वस्त्रे घालावीत 
- मुलींच्या स्कर्टची लांबी गुडघ्यापर्यंतच असावी 
- विद्यार्थिनींनी लिपस्टिक, लिप ग्लाॅस वापरू नये. 
- साैंदर्य प्रसाधनांचा वापर नकाे 
- कानातील साेडून काेणतेही दागिने घालू नये 
- मुलांनी केस बारीक ठेवावेत 
- अंगावर टॅटू काढू नये. 


मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न 
मुलांना शाळेत शिस्त लागावी तसेच मुलींची छेडछाड राेखली जावी या उद्देशाने विविध अटी घालण्यात अाल्या अाहेत. पालकांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांकडे जाण्यापेक्षा शाळा प्रशासनाकडे काेणत्या अटींबाबत विराेध अाहे याची तक्रार दिली असती तर एक बैठक घेऊन हा विषय चर्चेने साेडवता अाला असता. पालकांचा याबाबत गैरसमज झाला असून अाम्ही त्यांची बैठक घेण्यासाठी तयार आहोत. 
- सुचित्रा कराड, एमअायटीच्या विश्वस्त 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शाळेने डायरीमार्फत जाहीर केलेली नियमावली...

बातम्या आणखी आहेत...