आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक गुरु दादा जे.पी. वासवानी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दया, क्षमा, शांतीची शिकवण देत मानवतेचा प्रसार करणारे आध्यात्मिक गुरू साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे. पी. वासवानी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात साधू वासवानी मिशनमधील शांतिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी  देशभरातील त्यांचे अनुयायी उपस्थित होते. 

 
दादा वासवानी यांचे गुरुवारी सकाळी नऊ वाजता निधन झाले. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव साधू वासवानी मिशन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अॅड. वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक, पूनावाला फाउंडेशनचे सायरस पूनावाला, लीला पूनावाला, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, प्रसिद्ध उद्योजक निरंजन हिरानंदानी, एमआयटीचे प्रमुख विश्वनाथ कराड, सूर्यदत्ताचे संजय चोरडिया, जेट सिंथसिसचे राजन नवानी आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दादा वासवानी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.  


त्यानंतर दुपारी तीन वाजता साधू वासवानी मिशन येथून अंत्ययात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा कौन्सिल हॉल, पूना क्लब, क्वार्टर गेट, इरवाणी रोड, पदमजी गेट पोलिस चौकी, निशांंत टॉकीज, बाबा जान चौक, भोपळे चौक, एम.जी.रोड, अरोरा टॉवर्स, नेहरू मेमोरियल हॉल या मार्गे सुमारे पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करून पाच वाजता  साधू वासवानी मिशन येथे अंत्ययात्रेची सांगता झाली. फुलांनी सजवलेल्या गाडीत दादा वासवानी यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. या वेळी “व्हाय गुरू व्हाय गुरू दादा गुरू’, दादा क्षाःशरणंम् मम, हरे कृष्ण हरे राम दादा शाम दादा शाम, अशी भजने गात साधकांनी दादांना अभिवादन केले. अंत्ययात्रेनंतर दादांंवर शोकाकुल वातावरणात हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

शतक महाेत्सवी कार्यक्रम अधुराच
दादा वासवानी यांच्या शतक महाेत्सवी वर्षानिमित्त मिशनतर्फे 31 जुलै ते 2 अाॅगस्टदरम्यान कार्यक्रमांची अाखणी करण्यात येत हाेती. मिशनच्या कार्यालयात माेठा मांडव घालून दरराेज सत्संगाचे नियाेजन अंतिम टप्प्यात अाले हाेते. तसेच दादांनी गुरूंचा संदेश जनमानसात पाेहोचवण्याचे कार्य केल्याने त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या माध्यमातून उलगडला जाणार हाेता. २अाॅगस्ट दादांचा जन्मदिवस असल्याने मिशनने सदर दिवस ‘क्षमा दिवस’ म्हणून जाहीर केला हाेता. मात्र, या साेहळ्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

 

जन्म सिंध प्रांतातील
- दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात हैदराबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला.
- वडिलांचे नाव पहिलाजराय, तर आर्इचे नाव कृष्णादेवी होते. त्यांचे वडील पहिलाजराय हे हैदराबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर, साधू वासवानी त्या वेळी पतियाळा येथील महिंद्रा कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.
- दादांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथील टी. सी. प्रायमरी स्कूलमध्ये झाले. सुरुवातीपासूनच त्यांच्या आयुष्यावर काका साधू वासवानी यांच्या जीवनाचा प्रभाव पडला.
- ‘स्कॅटरी ऑफ एक्स-रेज बाय सॉलिड’ या विषयावर दादांनी प्रबंध लिहिला होता. नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रमण यांनी सदर प्रबंधाची प्रशंसा केली होती. दादांचे इंग्रजी व सिंधी भाषेवर विशेष प्रभुत्व होते.
- सोप्या व सुटसुटीत भाषेत आणि खणखणीत आवाजात ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत. दादांची राहणी साधी असे. अंगात पांढरा शर्ट, पायजमा, त्यावर ओेढलेली पांढरी शाल, साधी चप्पल, चमकदार डोळे, तेजस्वी चेहरा, चमकणारी नजर, ऊर्जा, तीक्ष्ण विनोदबुद्धी ही त्यांची वैशिष्ट्ये होत.
- ‘तुम्हाला आनंदानं जगायचं असेल तर इतरांना आनंदी करा’, ‘आजची तातडीची गरज काय, तर समजून घेणाऱ्या बुद्धीपेक्षाही समजून घेणारं हृदय’ असे त्यांचं आग्रहाचे सांगणे होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...