आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन ढिम्म..पोलिसांनीच बुजवले रस्त्यावरील खड्डे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिक आनंदी आहेत. मात्र, याच पावसाने प्रशासनाची झोप उडवली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात खडे की खड्यात रस्त्या, हेच कळत नाही आहे. मात्र प्रशासनावर अवलंबून न राहता पोलिस प्रशासनाने हातात कुदळ आणि फावळे घेत रस्त्यावरील खड्डे बुजण्याचा काम केले आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी थांबवायची की शहरातील खड्डे बुजवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पुण्यातील मावळ भागात काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था स्विमिंग पुलसारखी झाली आहे.  काळे पवनानगर ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे पवनानगर महागांव रोडवर पोलिस चौकीजवळील रस्त्यावर साचलेले पाणी पोलिस हवालदार राकेश पालंडे यांनी पुढाकार घेऊन स्वत: कदळ, फावडे हातात घेतले. रस्त्यावर गटार काढून साचलेले पाणी काढून रस्ता खुला केला. त्याचबरोबर पवना विद्या मंदिरातील विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांनी श्रमदान करत पुढाकार घेतला. पवनानगर ही परिसरातील 40 गावे वाड्यावस्त्यांची मुख्य बाजारपेठ तसेच सहकारी कार्यालये,  बँका, शाळा, महाविद्यालय यांचबरोबर शासकीय कार्यालय याच बाजारपेठेत असल्याने येथे कायम गर्दी असते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा फोटो...पोलिसांनीच बुजवले रस्त्यावरील खड्डे

 

बातम्या आणखी आहेत...