आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE CRIME: येरवडा कारागृहाबाहेर तुरुंगाधिकाऱ्यावर दोन अज्ञातांकडून गोळीबार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येरवडा मध्यवर्ती कारागृहाबाहेर एका 35 वर्षीय तुरुंगाधिकाऱ्यावर अॅक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी झाडली. मोहन पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते येरवडा तुरुंगात श्रेणी दोनच्या पदावर कार्यरत आहेत. पाटील यांनी वेळीच स्वत:चा बचाव केल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. या प्रकरणी त्यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

पाटील हे शुक्रवारी सकाळी जेल ओपनिंग ड्युटीसाठी 6 वाजता राहत्या घरातून निघाले. पायी-पायी येरवडा कारागृहाच्या मुख्य प्रवेश्वद्वाराकडे जात असताना 6.10 ते 6.20 वाजेदरम्यान कॉमर्स झोनचे दिशेने दोन इसम अॅक्टिव्हा दुचाकीवरून आले. त्यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने  पिस्तुलाने पाटील यांच्यावर एक गोळी झाडली. मात्र, वेळीच सावध झालेले पाटील बाजूला झाले आणि गोळी त्यांना न लागताच गेली. दरम्यान, त्यांनी गोळी झाडणाऱ्यांच्या दिशेने हातातील छत्री फेकली. पाटील आक्रमक झाल्याचे पाहून अाराेपींनी पळ काढला. याप्रकरणी येरवडा पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओेळख पटवण्याचे काम सुरू केले अाहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...