आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाला अालेल्या तरुणाचे अपहरण करुन धारदार शस्त्राने केल‍ी निर्घृण हत्या, झुडपात फेकला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमधील तरुणाचे अपहरण करून त्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. आज (शुक्रवार) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास पौड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नांदेगाव परिसरात ही घटना समोर आली. वाढदिवसाची पार्टी करण्‍यासाठी गेलेल्या तरुणाची त्याच्या मित्रांनी अपहरण करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य खोत (वय 25,पिंपरी) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य खोत हा दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता. पिंपरी परिसरात मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच्या रात्री मित्रांनी आदित्यला जबरदस्ती फिरायला घेऊन गेले. त्यानंतर दोन दिवस उलटल्यानंतर देखील आदित्य घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पिंपरी पोलिसांत दिली होती. पिंपरी पोलिस शोध घेत असतानाच आज सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास अचानक पौड पोलिस स्टेशनच्या हद्दीत मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह आदित्य खोत असल्याची माहिती समोर आली.

 

आदित्य खोत याच्या डोक्यावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले आहेत. त्याची हत्या करून त्याचा मृतदेह नांदेगाव येथील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

 

आदित्यच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस घटनेचा तपास करीत आहे. पोलिस आदित्यच्या मित्रांचाही शोध घेत आहेत

 

बातम्या आणखी आहेत...