आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुशी डॅममध्ये तरुणाचा बुडून मृत्यू तर तुंग किल्ल्यावर ट्रेकिंग करणारी तरुणी खोल दरीत पडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोणावळा परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुण आणि तरुणीला प्राण गमवावे लागले आहे. लोणावळ्याच्या भुशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत तुंग किल्ल्यावर ट्रेंकिंग करत असताना सोळा वर्षीय मुलीचा दिडशे फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना काल दुपारच्या सुमारास घडल्या आहे. दोघे जण पुण्यातील रहिवाशी असून लोणावळामध्ये फिरायला आले होते. अथक प्रयत्नानंतर डॉगजांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.  राजू शेख (वय-20) असे मतरुणाचे नाव आहे.तर ईशीता माटे वय-१६ रा.पुणे अस मुलीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार,  पर्यटकांसाठी आकर्षक असलेले भुशी धरण हे तुडुंब भरले आहे.याचाच आनंद घेण्यासाठी राजू आणि त्याचे मित्र हे पुण्याहून लोणावळा वर्षविहारासाठी आले होते.  राजू चा पाय निसटल्याने तो थेट भुशी धरणात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला

तर दुसऱ्या घटनेत ईशीता ही मुलगी 17 जणांच्या ग्रुप सोबत ट्रेकिंगसाठी आली असताना किल्ल्यातून खाकी उतरताना तोल गेल्याने दरीत खोल शंभर ते दीडशे थेट खाली पडली यात तिचा मृत्यू झाला आहे. ईशीता हिने ट्रॅकिंग करताना सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

 

दोन्ही घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीम च्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.लोणावळा शहरात अशा घटनांमुळे पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचं दिसून येत आहे. तर पर्यटकांनी देखील आपली काळजी घेणं महत्वाचं आहे

 

बातम्या आणखी आहेत...