आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात तिहेरी हत्याकांड, नाल्यात सापडले मृतदेह; एका मुलासह दोघा पुरुषांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील गणेश पेठेत एका पुलाखाली नागझिरा नाल्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन मृतदेह आढळून आले.  नाल्यात एका मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह आढळले आहेत. तिघांच्याही डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलगा नावेद याची ओळख पटली असून त्याच परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु होते.  


नागझिरा नाल्यामध्ये जवळपास १०० मीटर आत तिघांचे मृतदेह आढळले. या तिघांना खून एक किंवा दोन दिवस अगोदर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक पेंटर नाल्याच्या खालील बाजूला रंगकाम करत होता. नाल्याच्या शेवटच्या टोकाला रंग देण्यासाठी तो जात असताना त्याला तेथे एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर फरासखाना व समर्थ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे दाखल झाले. ते मृतदेहाची पाहणी करत असतानाच त्यांना १० ते १५ फूट अंतरावर आणखी एक पुरुषाचा मृतदेह आढळला. तपासणी करत असताना नाल्यामध्ये आणखी एक मृतदेह आढळला. हा मृतदेह पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलाचा होता. या तिन्ही मृतदेहांंच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन खून केला असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो.

बातम्या आणखी आहेत...