आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समर कॅम्पसाठी चेन्नईहून पुण्यात आलेली 3 मुले धरणात बुडाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चेन्नई येथून  पुण्याजवळील मुळशी तालुक्यात कातरखडक येथे उन्हाळी शिबिरासाठी अालेल्या एका गटातील तीन मुलांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मात्र, एका मुलाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी सापडला. एनडीअारएफच्या जवानांच्या मदतीने गुरुवारी शाेधमाेहीम राबवत दुपारी बारा वाजेच्या सुमारास उर्वरित दाेन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

 

संताेष के, गणेश राजा व सर्वण्णा (तिघांचे वय १३, रा. चेन्नई) अशी मृत मुलांची नावे अाहेत. चेन्नईतील ईसीएम मॅट्रिक्युलेशन शाळेचे सदर विद्यार्थी असून एक अाठवड्याच्या उन्हाळी शिबिरासाठी २० विद्यार्थी व चार शिक्षक (एक पुरुष व तीन महिला) मंगळवारी मुळशी तालुक्यातील कातरखडक येथील जॅकलिन स्कूल अाॅफ थाॅट स्वयंसेवी संस्थेत दाखल झाले हाेते. बुधवारी दुपारी सर्व विद्यार्थी व शिक्षक  कातरखडक बंधारा पाहण्यासाठी गेले हाेते. त्या वेळी तीन विद्यार्थी पाेहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न अाल्याने त्यांचा पाण्यातील गाळात अडकून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी गणेश राजा या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अाला होता. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...